महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची भरती 2018
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब व गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना अनुसरावयाची कार्यपद्धती
जिल्हास्तरीय रिक्त पदांवरील नेमणुका करण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे.
1) नियुक्ती प्राधिकार्यांनी जिल्हा निवड समितीकडे मागणीपत्र पाठविणे - दरवर्षी 15 जून पर्यंत
2) जिल्हा निवड समिती जाहिरात प्रसिद्ध करणे - दरवर्षी जुलै महिन्यात
3) लेखी परीक्षा / व्यावसायिक चाचणी घेणे - दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात
4) निकाल व निवाद्सुची जाहीर करणे - नोव्हेंबर महिन्यात
परीक्षा पद्धत : लेखी परीक्षा
लेखी परीक्षा एकूण गुण : - 200 किंवा 120
लेखी परीक्षेचे घटक :
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याकरिता प्रत्येकी 50 गुणांची राहील
किंवा 120 लेखी परीक्षा व 80 गुण शारीरिक चाचणी ( ज्या पदांना शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल त्यांना )
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याकरिता प्रत्येकी 30 गुणांची राहील .
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु