latest news maharashtra
सीटीईटी'साठी आरक्षणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
आरक्षण प्रवेशांसाठी दिले जाते. त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सोमवारी स्पष्ट केले. २०१९च्या केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणीसाठी (सीटीईटी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांसाठी असलेले १० टक्के लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे स्पष्ट केले.
आरक्षण हे पात्रता परीक्षेसाठीही लागू आहे हा पूर्ण चुकीचा समज आहे. किंबहुना, ही केवळ पात्रता परीक्षा आहे आणि आरक्षण हे प्रवेशांमध्ये दिले जाते.
त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. आपले म्हणणे पटवून देताना ७ जुलै रोजी होणाऱ्या 'सीटीईटी' परीक्षेबाबतच्या अधिसूचनेचा दाखला याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिला. मात्र या अधिसूचनेत अनुसूचित जाती-जमातींनाही आरक्षण देण्यात आलेले नाही, असा टोला लगावत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. परंतु या मुद्दय़ाचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी १६ मे रोजी सुनावणी ठेवली आहे.
'सीबीएसई'ने २३ जानेवारी रोजी 'सीटीईटी' परीक्षेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु या परीक्षेसाठी १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात आल्याचे नमूद केले नव्हते. त्यामुळे या वर्गातील 'सीटीईटी' परीक्षा देण्यास उत्सुक उमेदवारांनी याचिका करत या परीक्षेसाठीही १० टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. या परीक्षांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गासाठी लाभ देण्यात येत असतील, तर आम्हालाही आरक्षणाचा लाभ देण्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 'सीबीएसई'ने या परीक्षेसाठी आपल्याला आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवून घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणने
'सीबीएसई'ने २३ जानेवारी रोजी 'सीटीईटी' परीक्षेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु या परीक्षेसाठी १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात आल्याचे नमूद केले नव्हते. त्यामुळे या वर्गातील 'सीटीईटी' परीक्षा देण्यास उत्सुक उमेदवारांनी याचिका करत या परीक्षेसाठीही १० टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती.