डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार - 43,000 ते 65000
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
विद्यार्थी ११ वी, १२ वी व १२ वी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असावा. ११ वी मध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यास १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षणाकरिता १२ वी मध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. १२ वी नंतर पदवी, पदविका तसेच पदवी नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे.
अर्ज जमा करण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2018
( विद्यार्थी ज्या जिल्हातील महाविद्यालयात शिक्षण घेत असतील त्याच जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज जमा करावा.