राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (शासकीय, खाजगी) तसेच समाज कल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालया मार्फत चालवल्या जात असलेल्या शाळा अशा शाळांमधून सुमारे २.२५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळास्तरावरून वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बरासचा वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन सदर वेळ विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच सदर प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल. आपणा सर्वांना विद्यार्थी माहिती संकेत स्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.