राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2018-19
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
अर्ज सदर करण्याचा अंतिम दिनांक : 05/10/2018 वेळ : 05:00 pm पर्यंत
एकूण शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थी : 100
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदविका / पदव्यत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी
विद्यार्थ्यांसाठी अटी व शर्ती :
विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु 06 लाखांपेक्षा कमी असावे
पदवी अभ्यासक्रमासाठी इ.12 वीच्या परीक्षेत किमान 55 % मार्क्स असावेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत किमान 55 % मार्क्स असावेत.
हि शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी लागू राहील.
लाभाचे स्वरूप :
1) शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क इ. देण्यात येईल.
2) शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्याच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल.
वयोमर्यादा : पदवी अभ्यासक्रमासाठी 25 वर्षे कमाल मर्यादा, पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमासाठी 30 वर्षे कमाल मर्यादा राहील
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे
अर्ज कसा करावा : अर्ज विहित नमुन्यात भरून वरील दिलेल्या पत्त्यावर समक्ष द्यावा किंवा पोस्टाने पाठवावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे :
1) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र
2) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र
3) उत्पन्नाचा दाखला, फॉर्म न.16, आयकर विवरण पत्र
4) 12 वीचा दाखला ( T.C)
5) संस्थेत प्रत्येक्ष प्रवेश मिळाल्याचे संस्थेचे पत्र
6) आधार कार्ड, PAN कार्ड (पालकाचे), बँक पासबुक
7) संपूर्ण गुणपत्रिका ( १२वी, पदवी, पदविका )