RFID का ?
अनेकदा धावण्याच्या चाचणीत स्टार्ट म्हणण्यापूर्वीच काही उमेदवारांनी धावायला सुरुवात केलेली असते तर काहींना पिकअप घ्यायला वेळ लागतो. मात्र त्यांचा नेट वेळ कमी असू शकतो. शिवाय हातात स्टॉपवॉच घेऊन बसलेला कर्मचारी वॉच सुरू व बंद करेपर्यंत काही सेकंद जातात व एक सेकंदाच्या फरकानेही उमेदवारांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो. मानवी चूक टाळण्यासाठी व प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी RFID चीफ वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
RFID म्हणजे काय ?
रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस असे या चिफचे नाव असून मुंबई व इतर ठिकाणच्या पोलीस भरतीसाठी याचा यापूर्वी वापर करण्यात आलेला आहे. मॅरेथॉन स्पर्धेतही वेळेच्या अचूक नोंदणीसाठी याचा उपयोग होतो.
असे काम करेल RFID :
उमेदवारांना धावण्यासाठीची स्टार्ट व फिनिश लाईन येथे सेन्सर असतील. उमेदवारांनी धावायला सुरुवात केली की RFID ॲक्टीव्हेट होतील आणि फिनिश लाईन पर्यंत उमेदवार पोहचला कि आयडी सेकंदात व मायक्रोसेकंदात वेळ नोंदवेल. त्यामुळे कोणता उमेदवार आधी पोहचला यापेक्षा कोणता उमेदवार किती वेळात पोहचला यावर आता गुणांकन धरणार असल्याने यात अधिक पारदर्शकता येईल व उमेदवारांनाही याचा फायदा होईल. चाचणी होताच संगणक प्रणालीद्वारे नोंदवली गेलेली वेळ उमेदवारांना लगेच कळेल.