National Eligibility Cum Entrance Test NEET 2020Result
नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. स्वत: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली.
– आता जेव्हा नवीन पृष्ठ उघडेल तेव्हा आपली माहिती जसे की नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
– नीट 2020 ओएमआर शीट आपल्या स्क्रीनवर उघडेल.
– आपण ओएमआर शीट डाउनलोड करू शकता आणि उत्तरतालिके सह आपले उत्तर पडताळून पाहू शकता.
नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी देशभरातील ३,८४३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेला बसले. यावेळी एकूण १५ लाख ९७ हजार लाख उमेदवारांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापूर्वी एनटीएने नीट 2020 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे.