National Eligibility Entrance Test ( NEET ) 2018
Issue date Of Admit card : 17/04/2018
Last date for download admit card : 06/05/2018
Examination date : 06 May 2018
As per regulations framed under the Indian Medical Council Act-1956 as amended in 2018 and the Dentists Act-1948 as amended in 2018, NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST (UG), 2018 (NEET-UG-2018) will be conducted by the Central Board of Secondary Education (CBSE), for admission to MBBS/BDS Courses in India in Medical/Dental Colleges run with the approval of Medical Council of India/Dental Council of India under the Union Ministry of Health and Family Welfare, Government of India except for the institutions established through an Act of Parliament i.e. AIIMS and JIPMER Puducherry.
The NEET (UG), 2018 will be conducted on Sunday, the 6th May, 2018. The responsibility of the CBSE is limited to the conduct of the entrance examination, declaration of result and providing All India Rank to the Directorate General Health Services, Government of India for the conduct of counselling for 15% All India Quota Seats and for supplying the result to state/other Counselling Authorities.
Neet 2018 Admit card released in second week of April 2018.
सीबीएसईने 'नीट' 2018 परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दिवशी ड्रेसकोडसह भली मोठी आणि कडक नियमावली जारी केली आहे. परीक्षार्थींनी हाफ स्लीव्हचा फिकट रंगाचा शर्ट घालावा. इतकंच नाही तर परीक्षेला घड्याळ, बेल्ट शूज नको अशी अटी घालण्यात आली आहे.
मागील वर्षी नीट परीक्षेसाठी ड्रेसकोड निर्धारित केला होता, ज्यामुळे सीबीएसईला अनेक प्रकारच्या वादांचा सामना करावा लागला होता. या वादापासून वाचण्यासाठी यंदा सीबीएसईने महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड जारी केला आहे.
परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी ड्रेसकोड
1) परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या
2) कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी अॅम्ब्रोयडरी असलेले ड्रेसही परिधान करुन नये
3) परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील.
4)बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचायला हवं.
5) विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिलसोबतही एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
6) परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये
परीक्षेला अॅडमिट कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. सीबीएसईने मंगळवारी नीटचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं नाही तर सीबीएसई नीटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ते डाऊनलोड करु शकता.
परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी सीबीएसईने जारी केलेलं नोटिफिकेशन पूर्ण वाचा.