महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०१/२०१७. एकूण जागा - १५५. पदाचे नाव - सहायक विक्रीकर आयुक्त - ४१ पदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी - ०४ पदे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क - ०१ पद, तहसीलदार - २५ पदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी - ०३ पदे, कक्षा अधिकारी - १५ पदे, सहायक गट विकास अधिकारी - १६ पदे, सहायक निबंधक सहकारी संस्था - १४ पदे, उप अधीक्षक, भूमी अभिलेख - ०२ पदे, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ०२ पदे, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क - ०१ पद, नायब तहसीलदार - ३१ पदे. शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी. परीक्षा दिनांक - ०२/०४/२०१७.