उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर ( Post Matric ) शिष्यवृत्ती योजना 2018-19
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2018
शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम :
11 वी ते पी.एच.डी., व्यावसायिक (डी.एड, बी.एड,एम.एड, आय.टी.आय), सर्व डिप्लोमा, अकरावी/बारावी स्तरावरील एम.सी.व्ही.सी
किमान पात्रता व अटी :
1) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) विद्यार्थी मागील वार्षिक परीक्षेत किमान 50 % गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा.
3) अर्जदाराच्या पालकाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु 2 लाखापर्यंत असावे
4) अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड योजनेचा लाभार्थी नसावा.
5) नुतनिकरणासाठी विद्यार्थ्यास मागील परीक्षेत किमान 50% गुण असावे व विद्यार्थी त्याच महाविद्यालयात व त्याच अभ्यासक्रमास शिकत असावा.
6) एका कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांनाच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :
1) विद्यार्थ्याचा फोटो
2) मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत (self attested )
3) महाविद्यालयाने पडताळणी केल्याबाबतचे पत्र
4) पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे पत्र
5) अल्पसंख्यांक सामुदायाबाबातचे स्वत: प्रमाणित केलेले स्वयं घोषणा प्रमाणपत्र. 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
6) महाविद्यालयास चालू वर्षाची फीस भरल्याची पावती
7) बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची झेरोक्स प्रत
8) रहिवासी प्रमाणपत्र
9) आधार कार्ड झेरोक्स प्रत