बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ५१ जागांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ' सार्वजनिक आरोग्य खाते ' या विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्य अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १३/१२/२०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी ( प्रसूतिगृह ) - १६ जागा, वैद्यकीय अधिकारी ( बालरोग चिकित्साशास्त्र ) - २३ जागा, वैद्यकीय अधिकारी ( स्त्रीरोगतज्ञ ) - १२ जागा. शैक्षणिक पात्रता - MBBS . अर्ज पाठवण्याचा पत्ता - कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, ३ रा मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई - ४०००१२.