परीक्षा दिनांक : 03/06/2018
एकूण जागा : 13
पदाचे नाव : वेटर / वाढपी
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक : 05 मे 2018
अगोदर झालेली परीक्षा काही कारणामुळे रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे पुनर्परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावेत
लेखी परीक्षा केंद्र - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहर व नवी मुंबई परिक्षेत्रात
परीक्षेचे स्वरूप : लेखी परीक्षा
लेखी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम :
एकूण प्रश्न - 50 एकूण गुण - 100
वेळ : 01 तास
लेखी परीक्षा फक्त मराठी माध्यमातून घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा विषय व प्रश्न
1) मराठी भाषा - 10 प्रश्न
2) सामान्य ज्ञान - 20 प्रश्न
3) बौद्धिक चाचणी - 20 प्रश्न
प्रत्येक प्रश्नास दोन गुण राहतील.
प्रश्नपत्रिका वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी परीक्षेचा दर्जा सर्वसाधारण अभ्यासक्रमावर आधारित राहील.
प्रश्नांची काठीण्य पातळी 20:30:50 अशी अनुक्रमे सोपे, मध्यम व कठीण याप्रमाणे राहील.
कामाचे स्वरूप :
अधिकारी / कर्मचारी यांच्या मागणीनुसार खान-पान सेवा देणे, सर्व प्रकारच्या भाज्या साफ करून कटिंग करणे, टेबल साफ करणे, उपाहारगृहातील सर्व प्रकारची भांडी घासून स्वच्छ करणे, उपहारगृहातील साफसफाई, स्वच्छता राखणे.