Current Affairs Date 26 April 2019
92.60 science | 76.45 arts | 88.28 commerce | 78.93 vocational | 85.88 total |
Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८५.८८टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल घसरला आहे. गेल्यावर्षी बारावीचा निकाल ८८.४१ लागला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे.
विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा सर्वच शाखेचा निकाल यंदा घसरल्याचे राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.६० टक्के तर वाणिज्य शाखेचा ८८.२८ टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के, कला शाखाचे ७८.९३ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८९.५० टक्के निकाल लागला होता. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्यावर्षी ८२.१८ टक्के निकाल लागला होता तर यंदा ७८.९३ टक्के निकाल लागला आहे.
संपूर्ण राज्यात तब्बल ४,४७० विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विभागानिहाय निकाल पाहिल्यास यंदा पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के लागला आहे.
mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.