11 वी प्रवेश प्रक्रिया 2019
खालील माहीती काळजी पूर्वक वाचूनच नोंदणी अर्ज भरावा
नोंदणी खालील दोन पद्धतीने करता येईल
1) ऑफलाईन : कॉलेजमध्ये प्रत्यक्ष येऊन नोंदणी करणे.
2) ऑनलाईन : click below link to apply
नोंदणी अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडणे किंवा अपलोड करणे आवश्यक नाही, परंतु अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती अचूक असणे आवश्यक आहे. चेक लिस्ट मधील दुरुस्ती नंतर कोणताही बदल ग्राह्र धरला जाणार नाही.
नोंदणी व प्रवेश प्रक्रिया :
1) प्रवेश नोंदणी करण्याचा कालावधी : दि. 09 जून 2019 ते 15 जून 2019 दररोज सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत
2) चेक लिस्ट : दि. 17 जून 2019 दुपारी 2.00 वाजता
3) चेक लिस्ट दुरुस्ती : चेक लिस्ट मध्ये नाव, गुण, आरक्षण कॅटेगीरी (कास्ट), स्वजिल्हा, परजिल्हा इत्यादी मध्ये काही चूका झाल्या असल्यास दि. 18 जून 2019 व 19 जून 2019 रोजी दुरुस्त करण्यात येतील.
4) अनुदानित प्रवेशाची पहिली निवड यादी : दि. 22.06.2019 रोजी आरक्षण व गुणवत्ते नुसार जाहीर करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक असलेली शुल्क भरून आपला प्रवेश यादी जाहीर झाल्यापासून दि. 27.06.2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत निश्चीत करावा.
5) अनुदानित प्रवेशाची दुसरी निवड यादी : दि. 28.06.2019 रोजी आरक्षण व गुणवत्ते नुसार जाहीर करण्यात येईल. याच दिवशी विनाअनुदानीत ची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. या दोन्ही यादीतील विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक असलेली शुल्क भरून आपला प्रवेश यादी जाहीर झाल्यापासून दि. 04.07.2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत निश्चीत करावा.
6) अनुदानित ची तिसरी व विनाअनुदानीत ची दुसरी निवड यादी : दि. 04.07.2019 रोजी आरक्षण व गुणवत्ते नुसार जाहीर करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक असलेली शुल्क भरून आपला प्रवेश यादी जाहीर झाल्यापासून दि. 05.07.2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत निश्चीत करावा.
टिप : अनुदानित ची तिसरी निवड यादी जागा शिल्लक असतील तरच लावली जाईल याची नोंद घ्यावी.
11 वी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा (विद्यार्थी व पालक) मेळावा : दि. 09.07.2019 रोजी सकाळी 11 वाजता
दि. 10.07.2019 ते दि. 13.07.2019 या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, क्रॉप सायन्स, फिशरी सायन्स, क्रॉप प्रोडक्शन व IT हे विषय गुणवत्ता व आरक्षणनिहाय निश्चीत करण्यात येतील.
दि. 10.07.2019 ते 13.07.2019 रोजी महाविद्यालयात तीन तासिका होतील (12 ते 03)
दि. 15.07.2019 पासून महाविद्यालय पूर्ण वेळ (स. 07 ते दु. 04) होईल.