HSC EXAMINATION 2021 - RESULT
Days
Hours
Minutes
Seconds
बारावीचा निकाल जाहीर, 99.63% विद्यार्थी पास
विज्ञान – 99.45 टक्के
कला – 99.83 टक्के
वाणिज्य 99.81 टक्के
एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
इ.१२ वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल
निकाल दिनांक : 03/08/2021 वेळ : दुपारी 04:00 वाजता
राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी (August) लागणार आहे.
महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा (Official Announcement) करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.