असे आहे वेळापत्रक
१९ ते २३ जून बायोफोकल प्रवेश अर्ज, पसंतीक्रम भरणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचेही अर्ज भरणे. १९ ते २९ जूनपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व शाखा आणि बायोफोकल यामध्ये भाग १ आणि भाग २ अर्ज भरणे. गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. २६ व २७ जून रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत बायोफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील आॅनलाईन प्रवेश करणे. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे. २ व ३ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता अर्जांची पुनर्तपासणी करणे आणि हरकती नोंदविणे. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी. ८ ते ९ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. १० जुलै रोजी सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान रिक्त जागांचा तपशील. ११ व १२ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान अर्जाचा भाग भरणे आणि दुरूस्तीसाठी उपलब्ध. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. १६ व १७ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ वाजता दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश. १८ जुलै सकाळी ११ ते ३ वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश. १९ ते २० जुलै रोजी सकाळी ११ ते ५ वाजता अर्जाचा भाग १ आणि २ भरण्यासाठी आणि दुरूस्तीसाठी उपलब्ध. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. २४ व २५ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. २६ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि दुसºया फेरीचा कटआॅफ जाहीर करणे. २७ जुलै सकाळी ११ ते ५ वाजता अर्जांचा भाग १ आणि भाग २ भरण्यासाठी दुसºया भागातील दुरूस्तीसाठी उपलब्ध. ३१ जुलै सायंकाळी ६ वाजता विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे. १ आणि २ आॅगस्ट सकाळी ११ ते ५ पर्यंत विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश. ३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.