gram sevak recruitment for 13514 seats in rural development ministry
पुणे विभागात | औरंगाबाद विभागात | नाशिक विभागात | कोकण विभागात | नागपूर विभागात | अमरावती विभागात |
2721 | 2718 | 2574 | 2051 | 1726 | 1724 |
gram sevak bharti Total : 13514 |
gram sevak bharti 2019 pune vibhag, gram sevak bharti 2019 aurangabad vibhag, gram sevak bharti 2019 nashik vibhag, gram sevak bharti 2019 konkan vibhag, gram sevak bharti 2019 nagpur vibhag, gram sevak bharti 2019 amravati vibhag
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. लवकरच विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडून स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये विविध 21 पदांसाठी ही भरती असेल. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून बरीच पदं रिक्त आहेत. ही पदं भरल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईलच, मात्र नवीन तरुणांना संधीही मिळेल. पंकजा मुंडेंच्या निर्णयानंतर ग्रामविकास विभागाने भरतीचे आदेश काढले आहेत.
कोणकोणत्या पदांसाठी भरती?ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी या पदांसाठी ही भरती होणार आहे.
राज्यातील सहाही विभागात ही भरती होईल. पुणे विभागात सर्वाधिक 2 हजार 721 जागा आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात 2 हजार 718 जागा आहेत. नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती आणि त्याचे आरक्षण शासन नियमानुसार होणार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे.